बुधवार, ९ मे, २०१२

दिवस दुष्काळाचे...पाण्याच्या दुर्भिष्याचे...


सध्या राज्या पाण्याचा दुष्काळ झाला आहे. विदर्भातील आपले बांधव पाण्यासाठी वणवण भटकू लागले आहेत. त्यांनी मुंबईकडे स्थलांतर केले आहे. त्यांना कुणी अडवू शकत नाही. ही वेळ नाकर्त्या राज्यकर्त्यांनी आणि प्रशासकांनी आणली आहे.पाणी हे जीवन असे आपण म्हणतो, पाण्याशिवाय जीवन व्यर्थ आहे. पण हे जीवन व्यर्थ करण्याचे काम या राज्यकर्त्यांनी केले आहे. आणि आता पाण्यावरून भांडत आहे. पाण्यावर आतापर्यंत पाण्य़ासारख्या योजना आल्या. त्यावर पाण्यासारखा पैसा खर्च झाला आहे. पाण्याप्रमाणे हा पैसाही मुरला आहे.
देश स्वतंत्र झाला. तेव्हा पहिली पंचवार्षिक योजना ही पाण्यासाठी आखली गेली. हरित क्रांतीचे स्वप्न त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी पाहिले. त्या कच्छ सारखा वाळवंटी भाग हिरवागार झाला.  
हा देश विविधतेने नटलेला. पाऊसही तसाच पडतो. मौसमी पावसावर आपले जीवन अवलंबून असले तरी जो पाऊस पडतो. त्याचे संपूर्ण पाणी अडवून जिरवण्याची सोय नाही. गंगेला, ब्रह्मपुत्रेला पूर येतो या नद्याचे पाणी नदी जोड प्रकल्पाने भविष्यात देशभर पाणी पाजले जाण्याची शक्यता दुरापास्त आहे. पण महाराष्ट्रात विशेष  ता कोकणचा विचार केला तर रायगड, ठाणे हे मुंबईकरांची तहान भागवणारे जिल्हे पण जेथून पाणी येते त्या भागातही भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तेथील लोकांवर ही अन्याय आहे. 
कोकणातल्या पाणीटंचाई बद्दल काय बोलावं. भरपूर पाऊस होतो. पण पाणी जिरवण्याची व्यवस्था नाही. कोकणातला माणूस दळभद्री आणि नेते तर एकदम नाकर्ते. कोकणी तरूणांचा वापर गुंडागर्दीसाठी करून घ्यायचा. त्यांचे प्रबोधन वा मानसिकता बदलण्याचे काम कोणीच करीत नाही. परजिल्ह्यातील जे अधिकारी येथे आहेत ते पैशासाठी योजनांची वाट लावीत आहेत.
जळावू लाकडे आणि हापूसायी कोकणची जंगले नष्ठ करण्यात आली. आता तेथील भूजल पातळी एवढी खाली गेली आहे की साध्या विहीरीला पाणी जेथे २५-३० फूटांवर मिळायचे  तेथे  ते ६० फउटांवरही मिळेनासे झाले आहे. बोअरवेलला पाणीच मुळात 300 फुटांवर लागते. इतकी भूजल पातळी खाली गेली आहे. याला कारणीभूत असलेल्या माफियांना सरकारी अधिकारी, पोलीस, वनखात्याचे अधिकारी यांना काही कधी कारवाई केल्याचे जाणवत नाही. ऐकीवात वा वाचनात नाही. कोकणाचा कॅलिफोर्निया कुणाला करता आला नाही पण कोकळसा मात्र करणे चालू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: