मंगळवार, २९ मार्च, २०११

मरणाचे कुतुहल तो एक सुखी

 मरणाच्या विचाराने सारेच घाबरतात
भेकडाचे जीणं जगत
रोजच सारे मरत असतात
जगण्यावरचे प्रेम
भौतिक आशा-आकांक्षातेत घालवताना
तळागाळाचा विसर होतो
सत्कर्माचा विसर होतो
माणुसकी-माणुसकीला पोरकी होते
मरणात जग जगते
सरणात सारे विरून जाते
मग हवा कशा हा वृथा अभिमान....
मरणाचे ज्याला कुतुहल
तो एक सुखी.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: