सोमवार, १ ऑक्टोबर, २०१२

बापू





























बापू..

स्वातंत्र्यासाठी झगडताना
गरिबीचा तुम्ही केलात
फुल पॅंट ऐवजी 
तुम्ही पंचा पसंत केलात
सामान्यांसाठी
असामान्य अशी कामगिरी
तुम्ही केलीत
तुमच्या विचारांची आता
गांधीगिरी झाली आहे
गांधीगिरीच्या संकल्पाना
कुणी तरी कधी मुन्ना भाई,
कधी तुमच्या नावावर जगणारे,
तर कधी सामान्य जन्य
आधारासाठी करतात
तुमच्या गांधी विचारांचा वापर
बापू...
ऑस्कर नंतर
या जगात
या देशात
तुम्हांला खूप भाव आहे
असे वाटलं नव्हतं
ऑस्करच्या जय हो नंतर
तुम्हांला मरणोत्तर 
जगात खूप भाव आला
त्याबरोबर देशालाही जाग आली
तुमच्या वस्तू ओटीसने 
ओलीस ठेवल्या
कसपटासमान वाटणा-या
एकेका वस्तुला भाव आला
तुमचा चष्मा,घड्याळ
एकदम प्लॅटीनम,परिस बनलं
आणि स्वातंत्र्यदेवतेच्या देशातच
तुमच्या या डीजांचा लिलाव झाला
बापू...
हा लिलाव तुम्ही स्वर्गातून पाहिलात
आपल्या नावाचा वापर करणारे दुसरे गांधी
पुढे येतील असे तुम्हांला वाटेल होते
पण एकही सुपूत पुढे आला नाही
स्वीस बॅंकेत काळा पैसा टेवायला
आम्ही बलाढ्य आहोत
जीवनभर तुम्ही मद्याला विरोध केलात
त्या मद्या आणि मदिराक्षीमध्ये रमणारा
मल्ल्या पुढे आला
बापू..
तुम्ही चक्रावून गेला असाल
तुम्हांलाच झिंग चढल्या सारखे झाले असेल
पण बापू ...
देशातली परिस्थिती आता वेगाने बदलली आहे
पाण्यापेक्षा पेप्सी स्वस्त आहे
गल्लोगल्ली हातभट्या लागत नाहीत
तिजोरी भरण्यासाठी बिअर शॉपी
जागोजागी खुल्या आहेत
बापू ...
देशातली परिस्थिती आता वेगाने बदलली आहे
सज्जन दानशूर संपले आहेत
बदमाश वाटणारे खरे दानशूर बनले आहेत
तेच सामान्यांच्या उपयोगाला येत आहेत
बापू..
तुम्ही वाईट वाटून घेवू नका
ढसा ढसा रडू नका
जग आता खरंच बदलंय
सोबत तुमचा चष्मा असता
तर ते तुम्हांला पाहता आलं असतं
पण बरं झालं तुमचा चष्मा
तुमच्या सोबत नाही
बापू आम्ही सारे हतबल आहोत
असं म्हणत असताना
एक आशा मनात आहे
तुमच्या सत्याचे प्रयोग
नव्याने मांडण्याचा प्रयत्न
अण्णा-बाबा करीत आहे
आता हीच एक आशा आहे
बापू
तुम्ही शहराकडून खेड्याकडे जाण्याचा नारा दिला
आपले सत्ताधिशी ते तंतोतंत पाळत आहे.
गावेचे गावे खरेदी करून
तेथल्या गावक-यांना बेघर करीत आहेत
तुमच्या राजकीय पाईकांचा
गरिबी हटविण्यापेक्षा  
गरीबच हटविण्याचा एक कलमी कार्यक्रम आहे  
बापू ....
भारतात यापूर्वी गरिब होता असे
तुमच्या जागी पुतळा उभा राहयला
तर आश्चर्य वाटून घेवू नका
हा देश महान आहे..
त्याचे नाव भारत आहे.
---विनायक सुतार(७ मार्च २००९) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: