शनिवार, ४ ऑगस्ट, २०१२

अण्णा कशाला हा उपद्व्याप......?

अण्णा हजारे आणि त्यांच्या टीमचे जंतर-मंतर संपत आल्याचे आता अलीकडे केलेल्या आंदोलनातून स्पष्ट होत आहे. अण्णांची आंदोलने जेथे पर्यंत त्यांच्या हाती तिथपर्यंत या आंदोलनाची धग सत्ताधारी आणि विरोधकांनाही जाणवत होती. त्यांच्या व्यासपीठावर झालेल्या घुसखोरीने  अण्णांच्या आंदोलनाला आणि त्यांच्या विचाराला मोठा धक्का बसला आहे. ग्रामसभांना अधिकार, राज्यात प्रथम माहिती अधिकार आणण्यात आणि प्रामाणिकपणे त्यांनी केलेल्या प्रकरणांच्या पाठपुरा्व्याने अनेक मंत्र्यांची गंच्छती अण्णांनी केली. प्रथम महाराष्ट्रातील राजकारणी आणि प्रशासनाला त्रस्त करणा-या अण्णांनी सशक्त लोकपालासाठी केंद्र सरकारच्या नाकी नवू आणले. मात्र या आंदोलनातील आमरण उपोषणाची दखल केंद्र सरकारने यावेळी घेतली नाही. हे विशेष जरी असले तरी लोकशाहीत सनदशीर मार्गाने उपोषणकरणे गैर आहे. गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गांनी देशाला स्वातंत्र मिळवून दिले. त्यांनी दिलेल्या मार्गाचे आचारण हे सर्वश्रेष्ठ आचारण आहे. अण्णांच्या वा त्यांच्या सहका-यांच्या उपोषणाची दखल सरकारने न घेण हा लोकशाही व्यवस्थेचा उपमर्द आहे.

अण्णा एक साधी-सुधी व्यक्ती नाही. देशात अनेक स्वातंत्र्यसैनिक ह्यात आहेत. त्यापैकी बोटावर मोजण्या इतक्याही स्वातंत्र्यसैनिकांनी सुराज्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत. त्यांनी फक्त आपला मान-मरातब आणि किताब संभाळण्यात धन्यता मानली. पुन्ही कधी हे वीर एकत्र आले नाही. आणि हे एक व्रतस्थ आणि कसलाही पाश नसलेले फिकीर आहेत. फिकीरांभोवती पिच्छांची गर्दी झाली आणि त्या गर्दीत अण्णांचा चेहरा हरवत चालला आहे. अण्णा परिवर्तनासाठी  नवा पक्ष हवा असे जरी म्हणत असेल तरी त्यांनी या पक्षाच्या फंदात पडू नये. त्यांच काम वेगळे आहे. ते त्यांनी वेगळेपणांनी करावे.देशात अनेक समस्या आहेत. या लोकांना कळत नाहीत. पण ते शेवटी काम न करणा-या भष्ट्र लोकांनाच शेवटी निवडून देतात. हे वास्तव आहे. तुम्ही पाठींबा देत असलेला पक्ष कुठे निरपेक्ष राहणार आहे. त्यालाही भष्ट्र मार्गाचा अवलंब करावा लागेल. त्याशिवाय निवडणुका लढवता येणार नाही आणि जिंकताही येत नाही. त्यामुळे अण्णांनी पक्षाच्या उपदव्यापात पडू नये त्यांचे जे प्रथमपासून एकले कार्य सुरू आहे ते अंतिम क्षणापर्यंत चालू ठेवावे. त्यातच देशाचे आणि पर्यायाने महाराष्ट्राचे हीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: