शनिवार, ४ ऑगस्ट, २०१२

मरणाच्या विचाराने
सारेच घाबरतात
भेकडाचे जीणं जगत
रोजच सारे मरत असतात
जगण्यावरचे प्रेम 
भौतिक आशा-आकांक्षातेत घालवताना
तळागाळाचा विसर होतो 
सत्कर्माचा विसर होतो 
माणुसकी-माणुसकीला पोरकी होते
मरणात जग जगते 
सरणात सारे विरून जाते
मग हवा कशा हा 
वृथा अभिमान.... 
मरणाचे ज्याला कुतुहल 
तो एक सुखी.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: