गुरुवार, २८ एप्रिल, २०११

लोकचेतनाः नावापुरतीच....

२६ एप्रिल मंगळवारी सर्व शिक्षा अभियानातर्गत बांद्रा येथील अजुमन इस्लाम या शाळेत उपक्रमः वेचक वेधक या विषयावर एक दिवसाची कार्यशाळा झाली. या कार्यशाळेला आदर्श शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक, सीआरसी, शिक्षण उपनिरीक्षक आणि इतर मान्यवर असे सारे हजर होते. मुंबईतील उत्तर, दक्षिम आणि पश्चिम या तीनही शैक्षणिक विभागातील मंडळी या कार्यशाळेस उपस्थित होती.
प्राथमिक शिक्षण परिषदेचे संचालक मा. नंदकुमार यांच्या प्रेरणा-१,२,३,४ यांचे यावेळी वाचन करण्यात आले. त्याच्यावर चर्चा. तसेच वेचक-वेधक या प्रकाशित करण्यात आलेल्या आमि जिल्हा परिषद शाळेत शिक्षक राबवित असलेल्या उपक्रमावर आधारित या पुस्तकातील निवडक लेखांचे वाचन माझ्यासह काही शिक्षकांनी केले. शाळेत चालणा-या उपक्रमांची माहिती उपस्थितांपैकी काहींनी दिली. एकूण या कार्यशाळेतून ब-यापैकी उहापोह हा उपक्रम आणि त्यावर आधारित कल्पनांवर होता. नेहमी शिक्षक आणि संबंधित घटकांना फक्त या सा-या गोष्टीत राबविले जाते. शिक्षकांना डोस पाजले जातात. मात्र पालक आणि संस्था चालकांना होणा-या बदलांची काही कल्पनाच नसते. माझे हे विधान अधिका-यांनी खोडून काढले. लोकचेतना अभियान त्यासाठी राबविले जात असल्याचे सांगण्यात आले. आणि काय आश्चर्य या अभियानाच्या कार्यशाळेत आज  सहभागी होण्याचा योग आला. ७-८ पालक माझ्या कार्यशाळेत आहेत.
कार्यशाळेत मी तसा उशीरा पोहोचलो. कारण मला आयत्या वेळी बोलावण्यात आले. पण जी चर्चा झाली ती उपयुक्त होती. आणि आहे. चांगल्या योजनांचा बोजवारा केवळ वेळ चुकत असल्याने होत आहे. ही बाब याच कार्यक्रमासाठी होते असे नाही. सगळ्याच योजनांचे असेच आहे. (अपूर्ण)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: