मंगळवार, २६ एप्रिल, २०११

कार्यरत दिभि

आज सकाळी उशीरा येतोय असं सांगण्यासाठी चासकर सरांना फोन केला. त्यांनी त्याच वेळी शाळेचे विश विश्वस्त मा. दि. भी. कुलकर्णी यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी दिली. माजी मुख्याध्यापिका इंदिरा कुलकर्णी यांचे ते यजमान. संस्कृतचा गाढा अभ्यास असलेल्या दिभिंना सारेजण पप्पा म्हणत. अगदी खुद्द त्यांच्या पत्नी देखील त्यांना याच नावाने संबोधित. मुलुंडमधील अतिशय उत्साही असे हे व्यक्तिमत्व होते. संघाशी संबंध असल्याने संघांशी संबंधित अशा संस्कार भारती, सहकार भारती या संस्थांशीही त्यांचा निकटचा संबंध होता. त्यांचे ते पदाधिकारीही होते.
आयडीके मॅडमचे मिस्टर असलेल्या दिभिचा पिंड हा समाजसेवेचा होता. सतत काही ना काही त्यांचे काम चालले असे. त्यांचे अँक्टीव्हा स्कूटरवरून त्यांची होणारी पळापळ आमच्या सारख्या तरूणांना लाजविणारी होती. मुलुंडमध्यल्या अनेक सामाजिक संघटना, संस्था यांच्याशी त्यांचा निकटचा संबंध होता. ते आजारी असल्याची माहिती मुलुंडमध्ये राहूनसुध्दा कळली नाही याबद्दल खंत वाटते. रूग्णालयातून परतल्यानंतर ते त्यांनी आराम केला नाही आपले आजारपण विसरून ते आपल्या कार्यात मग्न झाले आणि त्यातूनच त्यांचा पोटाचा असलेला आजार बळावला. अशी कुजबूज आप्तजन करीत होते.
एक खरे आहे, जी माणसे सतत सेवेत असतात त्यांना आजार असा वाटत नसतो. समाजसेवा हा त्यांच्यासाठी उपचार असतो. कार्यरत असताना पप्पांनी निघून जाणे हे ज्येष्ट नागरिक म्हणून जीवन जगताना आयडीके मॅडमसाठी ही मोठे कठीण आहे. वृद्धापकाळात खरा आधार हा साथीदाराचा असतो. तोच त्यांचा तुटला आहे.

1 टिप्पणी:

arun mhatre म्हणाले...

असे काही झाले की नंतर सोबतीच्या माणसाला कसे सामोरे जावे तेच कळत नाही. खूप दिवस उलटून गेले पण अजून मला आयडीके मॅडम ना भेटायचे धाडस होत नाही.त्यांना माझ्या भावना कळव.